उस्माननगर, माणिक भिसे l पोलिस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या वतीने सप्टेंबर 2025 महिन्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. संजय निलपत्रेवार यांना एक नव्हे तर तब्बल चार सन्मानपत्रांनी पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.


श्री. निलपत्रेवार यांनी CCTNS प्रणालीत 68.66% डेटा फीडिंग करून “Best Data Feeding in CCTNS of the Month – September 2025” हा पुरस्कार पटकावला.


त्याचप्रमाणे, सप्टेंबर महिन्यातील 56 गुन्ह्यांचा यशस्वी निपटारा करून त्यांनी “Best Crime Disposal of the Month – September 2025” हा सन्मान मिळवला.


याचबरोबर, गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध 82% ( शिक्षाचे प्रामाण) कन्व्हिक्शन रेट राखत 95.76% समन्स उत्कृष्ट निपटारा केल्याबद्दल त्यांना “Best Commendable Performance of the Month – September 2025” हा तिसरा सन्मान देण्यात आला.

ही सर्व प्रमाणपत्रे पोलिस उपमहानिरीक्षक *श्री. शहाजी उमाप* (भा.पो.से.) आणि पोलिस अधीक्षक *श्री. अभिनाश कुमार* (भा.पो.से.) यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, महिन्याभरात सर्वाधिक आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात उस्माननगर पोलिस ठाण्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या त्रिगुणी गौरवामुळे नांदेड जिल्हा पोलिस दलात तसेच उस्माननगर पोलिस ठाण्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सहकाऱ्यांनी श्री. संजय निलपत्रेवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

