किनवट, परमेश्वर पेशवे| आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजण्या पूर्विच किनवट – माहूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छीणारे गुडघ्याला बाशिंग बांधून मला कोण कोणत्या समाजाची किती व कशी मते मिळणार यांचा ताळेबंद सांगून मीच निवडून येवून आमदार होणार असे मतदारांना उमेदवार सांगत फिरत आहेत.
किनवट – माहूर विधानसभा मतदार संघात विविध जाती धर्माचे लोक राहातात. परंतु तालुक्यात इतर सर्व समाजा पैकी बंजारा व आदिवासी हे दोन समाज जवळपास सारखी लोक संख्या असलेले सर्वात मोठे समाज आहे. आज पर्यंत मराठा समाजाचे डी.बी. पाटील हे दहा वर्षे आमदार राहीले . बाकीचा सर्व काळ आदिवासी समाजाचे किशनराव पाचपुते पंधरा वर्षे व भिमराव केराम सात वर्षे तर बंजारा समाजाचे सुभाष जाधव तिन वर्षे व प्रदिप नाईक पंधरा वर्षे आमदार राहीले आहेत.
मागील चार टर्म पासून प्रदिप नाईक विरुद्ध भिमराव केराम या दोघातच लढत होवून केराम एक वेळा तर नाईक ३ वेळा निवडून आले . २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात होते. त्या पैकी खरी लढत भाजपाचे भिमराव केराम , राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदिप नाईक व वंचित बहूजन आघाडीचे हमराज उईके यांच्यात तिरंगी लढत होवून भिमराव केराम हे १३ हजार २७२ मतानी निवडून आले होते.
आगामी काळात होणाऱ्या २०२४ मधील विधान सभा निवडणूकीचे लवकरच बिगुल वाजणार असल्याची चाहूल लागताच विधानसभा निवडणूक लढवू इच्छीनारे उमेदवार विद्यमान आमदार भिमराव केराम व माजी आमदार प्रदिप नाईक यांनी मागिल एक वर्षापासूनच तयारी सुरू केली आहे.
तरआशोक पाटील सुर्यवंशी, सचिन नाईक,उ.बा.ठा कडून ज्योतीबा खराटे हे सुध्दा आधून मधून एक वर्षापासून मतदाराची भेट घेत आहेत. आघाडीतील व युतीतील घटक पक्षाची विधानसभा निवडणूकीत युती होईल की, स्वतंत्र निवडणूक लढणार याच्यावर चित्र अवलंबून राहाणार आहे. जर युती झाली तर दुरंगी किंवा तिरंगी लढत होवू शकते. परंतू युत्या नाही झाल्या तर मात्र चौरंगी – पंचरंगी लढत होईल असे वाटते. ४ टर्म पासुन म्हणजे विस वर्षातील विधान सभा निवडणूकीत प्रदिप नाईक विरुद्ध भिमराव केराम यांच्यातच सरळ सरळ लढती झाल्या आणि २०२४ मधील लढत सुद्धा या दोघातच होणार असे मतदार संघात बोलले जात आहे.
मतदार संघातील तरूण आता मतदार संघातील एखादा तरुण तडफदार ग्राऊण्ड लेवलला कार्य करीत मतदार संघाचा विकास करणारा नेता उदयास आला पाहीजे आशी आशा बाळगून आहेत. काहीना दोघेही आता नकोशे वाटत असले तरी त्यांच्या पेक्षा सरस व चांगला उमेदवार विधान सभेसाठी मिळत नसल्याने दोंघा पैकी एकांना नाईलाजास्तव मतदान करावे लागते अशी ही चर्चा नेहमी ऐकावयास मिळते. मागील पंधरा वर्षांमध्ये माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट तालुक्याचा भरघोस विकास घडवून आणला, त्याचप्रमाणे आमदार भीमराव केराम यांनी सुद्धा या मतदारसंघात विकासाची गंगा चालू ठेवली.
कोणाला काही वाटले कितीही इच्छूक असले तरी २०२४ च्या विधान सभा निवडणूकीत ही नाईक विरुद्ध केराम अशीच लढत होणार असाही मतप्रवाह असल्याचे ऐकावयास मिळते .यावेळेस भिमरावजी केराम सत्ताधारी भाजपा पक्षाचे आमदार असल्याने त्यांनी निधी भरपूर आनुन मतदार संघाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे . तोच विकासा मुदा घेवून मतदार संघात फिरून मतदाराला केलेला विकासाचा लेखा – जोखा सांगत आहेत . केलेल्या विकासाच्या जोरावर मी निवडून येणार असा विश्वास त्यांना वाटत आहे .
माजी आमदार प्रदिप नाईक किनवट – माहूर विधानसभा मतदार संघातून तीन वेळा निवडून आले. चौथ्यांदा २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला. पराभव होऊन ही ते सतत आमदार असताना जसे जनतेसी वागायचे त्याच प्रमाणे ते आज पर्यंत जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या आडी आडचणी सोडवत असल्याने जनतेतून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे . यावेळेस आंध आदिवासी समाज केराम साहेबावर नाराज असल्याने गेल्या वेळेस विरोधात गेले ले मतदान मिळेल व लोकसभा निवडणूकीत युतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने आघाडी साठी वातावरण पोषक आहे .लोकसभा निवडणूकीत मतदार संघातून आघाडीचे खा. आष्टीकर यांना १३ हजार मताची आघाडी मिळाल्याने त्यांना मिच निवडून येणार असे वाटत आहे.
तिसरे इच्छूक उमेदवार सचिन नाईक तरुण आहेत राज्यातील सरकार मधील संजय राठोड यांचे मेव्हणे आहेत. त्यांची मागील टर्म पासुन विधान सभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे .त्यासाठीच आधून मधून मतदार संघातील जनतेशी संपर्क ठेवतात .परंतू भाजपा व शिवसेनेची युती राहून किनवट विधान सभेची जागा भाजपाच्या वाट्याला असल्याने त्यांना हिरमोड व्हावे लागत आहे .त्यांना तिकीटाची शास्वती नसल्याने ते आचानक नशिबाने युती फिस्कटली अन संधी मिळाली तर विधान सभा लढवयाची या बेताने सतत सर्व जाती धर्मातील लोकाशी संपर्कात राहातात .
मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहाणाऱ्या उधोजक डॉ. आशोक पाटील सुर्यवंशी यांनी ही पैशाच्या जोरावर विधान सभा जिंकता येणारा विधान सभा मतदार संघ कोणता हे शोधताना त्यांची जन्मभूमी असलेला किनवट मतदार संघ त्यांनी निवडला. विधानसभा मतदारसंघात राजकिय प्रवेश करताना एवढा जबरदस्त केला. मेनबती बनवने, आगरबती बनवने इतर अनेक लघू उद्योग सुर करू, साखर कारखाना उभारू किनवट व माहूर तालुक्याचा विकास साधू असा प्रचार करत महिला व तरुणाचे मोठे संघटन केले. किनवट तालुक्यात १०० इंग्रजी एल के जी , यु के जी च्या शाळा काढल्या किनवट व माहूर तालुक्यात त्यांचा प्रभाव पडू लागला जनता त्यांच्या कडून विकासाची आशा करू लागली. नगर पालिका निवडणूकीत यश मिळाले व जिल्हा परिषदेच्या दोन गटातून त्यांच्यासमर्थकास त्यांनी निवडून आनले त्यामुळे त्यांना ही विधान सभा निवडणूकीत मी निवडून येईन अशा वाटत आहे .
परंतू आश्वासना प्रमाणे त्यांनी कुठे आगरबती चे इतर कोणतेच लघू उधोग सुरु केले नाही. सुरु केलेल्या सर्व इंग्रजी शाळा बंद केल्या मुळे आता त्यांच्यावर या मतदार संघातील जनता त्यांनी एखादा मोठा उधोग किंवा साखर कारखाना उभारल्या शिवाय त्यांच्यावर जनता आता विश्वास ठेवणार नाही असे त्यांच्या बदल जानकार लोकांकडून बोलले जात आहे . खरे चित्र विधान सभा निवडणुका लागल्यावरच स्पष्ठ होणार आहे .