नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी यापूर्वी डॉ. दिगंबर नेटके हे होते. ते नियत वयोमानानुसार दि. ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलाचे वरिष्ठ प्राध्यपक डॉ. डी.एम. खंदारे यांची प्र-संचालकपदी निवड केली आहे.
डॉ. डी. एम. खंदारे यांनी यापूर्वी विद्यापीठाचे प्र-वित्त व लेखाधिकारी, क्रीडा विभागाचे संचालक म्हणूनही यशस्वीरित्या काम पहिले. डॉ. खंदारे यांना शैक्षणिक आणि प्रशासनातील प्रदिर्घ अनुभव असून त्यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील उत्तम मार्गदर्शक म्हणुन नावलौकिक मिळविले आहे. या दरम्यान त्यांनी विद्यापीठ प्रशासनातील अनेक समित्यांमध्ये काम केले आहे. सध्या ते वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.
या त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, आंतर विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नरेंद्र चव्हाण, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुर्यकांत जोगदंड, हणमंत कंधारकर, इंजि. नारायण चौधरी, डॉ. सुरेखा भोसले, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, यांच्यासह उपकुलसचिव डॉ. हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. कुलसचिव रवि मोहरीर, विलास साळवे, महेश कुलकर्णी, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलातील सर्व प्राध्यापक यांच्यासह विद्यापीठातील संचालक, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.