नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडतर्फे येथील अनिरुद्ध नृसिंहराव दांडगे भावसार यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी ( विद्यावाचस्पती )पदवी प्रदान करण्यात आली.


अनिरुद्ध दांडगे भावसार यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडअंतर्गत स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसच्या संचालिका डॉ. सौ.संगीता माकोने यांच्या मार्गदर्शनाखाली “सिंथेसिस अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ सम न्यू हेट्रो सायक्लिक कंपाउंड अँड स्टडी ऑफ देअर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी” या विषयावर आपला प्रबंध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडला सादर केला होता.

याबद्दल अनिरुद्ध दांडगे भावसार यांचे इंडियन रेड क्रॉस सोसायटी , नांदेड तसेच सकल भावसार समाज मराठवाडा विभाग, नांदेड जिल्हा भावसार समाज,जिल्हा आरोग्य विभाग यांच्यावतीने गौरव करण्यात आला.



