नांदेड l शहरातील मनपा वसाहत काबरा नगर येथील जेष्ठ नागरिक आनंदराव माणिकराव देशमुख शिरडकर (८६) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी दि. (८) रोजी सकाळी ९वाजता मनपा वसाहत येथून निघणार असून गोवर्धन घाट स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. ते मनपा कर्मचारी मंगेश देशमुख यांचे वडील तर ॲडव्होकेट चंद्रशेखर देशमुख यांचे काका होत.




