हिमायतनगर। किनवटहून लातूरकडे जाणाऱ्या एस टी महामंडळ बस समोर अचानक दुचाकी आल्याने युवक जखमी झाल्याची घटना हिमायतनगर शहराजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ दिनांक 25 रोज रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून या जीवघेणा अपघातातून युवक वाचला असला तरी दुचाकीचा मात्र चक्का चुर होऊन नुकसान झाले आहे.


हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या किनवट -भोकर -नांदेड या राष्ट्रीय महामार्गामुळे मोठ्या वाहनाबरोबर दुचाकी गाडया देखील भरधाव वेगाने चालविल्या जात आहेत. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास किनवट येथून लातूरकडे जाणारी एस टी महामंडळ बस क्रमांक एम एच 14 – बी टी 2105 ही बस येत होती. दरम्यान हिमायतनगर शहरातून इस्लापूरकडे दुचाकीवरून रेहान मोहम्मद जाफर वय 18 वर्ष हा जात होता.


याचवेळी अचानक दुचाकी चालकाचा ताबा सुटल्यामुळे की काय..? दुचाकी एसटी महामंडळाच्या बस समोर आली. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात महामंडळ बस चालकांनी आपली गाडी एका साईडला घेतली मात्र बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवर स्वार असलेला युवक जखमी झाला.अपघात घडताच तात्काळ हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णाला जखमी युवकास दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीते यांनी जखमी युवकांवर उपचार केले असून, युवकांस कानाच्यावर व पायाला थोडा मार लागला असून, युवकाचे नशीब चांगलं असल्याचे वाचल्याचे पोलिसांनी सांगीतले आहे.


दरम्यान किनवट करून नांदेडला जात असलेले एसटी महामंडळाच्या बस मध्ये देखील प्रवासी होते, सर्व प्रवासी सुखरूप असून, त्या प्रवाशांना उतरून अन्य वाहनाने पुढे पाठविण्यात आले आहे. रस्ता सोडून साईडला गेलेली बस आणि त्याखाली आलेली दुचाकी वृत्त लिहिपर्यंत अजूनही घटनास्थळावर जैसे होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिमायतनगर पोलीसानी घटनास्थळ गाठून अपघात कसा घडला याचा पंचनामा करून कोणतीही अनुचित घटना झाली नसल्याने या बाबत अपघाताची नोंद केली आहे.



