Accident himayatnagar ; एस टी महामंडळ बससमोर दुचाकी आल्याने हिमायतनगर शहराजवळ घडला अपघात -NNL
हिमायतनगर। किनवटहून लातूरकडे जाणाऱ्या एस टी महामंडळ बस समोर अचानक दुचाकी आल्याने युवक जखमी झाल्याची घटना हिमायतनगर शहराजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ दिनांक 25 रोज रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून या जीवघेणा अपघातातून युवक वाचला असला तरी दुचाकीचा मात्र चक्का चुर होऊन नुकसान झाले आहे.
हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या किनवट -भोकर -नांदेड या राष्ट्रीय महामार्गामुळे मोठ्या वाहनाबरोबर दुचाकी गाडया देखील भरधाव वेगाने चालविल्या जात आहेत. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास किनवट येथून लातूरकडे जाणारी एस टी महामंडळ बस क्रमांक एम एच 14 - बी टी 2105 ही बस येत होती. दरम्यान हिमायतनगर शहरातून इस्लापूरकडे दुचाकीवरून रेहान मोहम्मद जाफर वय 18 वर्ष हा जात होता.
याचवेळी अचानक दुचाकी चालकाचा ताबा सुटल्यामुळे की काय..? दुचाकी एसटी महामंडळाच्या बस समोर आली. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात...
