नवीन नांदेड़ l महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयोजित विभागीय युवा महोत्सव 2024-25 मध्ये 15-ते29 वयोगटात वक्तृत्व स्पर्धेत ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल नांदेड ची विद्यार्थिनी अक्षरा संजय मोरे हि द्वितीय आली असून तिची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
ही स्पर्धा लातूर येथे 6 डिसेंबर रोजी संपन्न झाली,या स्पर्धेतधाराशिव,लातूर व नांदेड येथील जिल्हास्तरिय स्पर्धेतून विजियी झालेल्या सहा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.त्यात अक्षरा ही व्दितीय क्रमांक आली असून तिच्या या यशा बद्दल शिक्षक व नातेवाईक यानी अभिनंदन केले आहे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी बि.आर.मोरे यांच्यी नात तर माजी नगरसेवक संजय मोरे यांच्यी मुलगी आहे.