श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहुर येथील घनदाट जंगलात असलेल्या सनातन अतिप्राचीन श्री यदुराज संस्थान वनदेव येथे दरवर्षी प्रमाणे प.पू. गुरुवर्य कैवल्य निज पदवासी खुशालजी पुरी महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्त दि.१ फेब्रु.ते ८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित अखंड दतनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली असून या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिश तथा मुख्य पुजारी प.पू. श्री दत्त पुरी महाराज यांनी केले आहे.


या पुण्यतिथी सोहळ्यात दररोज सकाळी पाच वाजता तिर्थस्थापना, काकड आरती, अखंड दत्त नामाचा जप तसेच माघ शुद्ध दशमी दि.७ फेब्रुवारी (शुक्रवारी) रात्री ९ वा. आनंद दत्त महापुजा १२८ श्रीफळांच्या पुजेला सुरुवात करण्यात येईल.दि.८ फेब्रुवारी रोजी शनिवारी काकड आरतीने या पुजेची सांगता करण्यात येणार आहे.



सकाळी ८ वाजता श्रीची समाधी अभिषेक, महाआरती व सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत महाप्रसादाने या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.तरी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे मठाधिश तथा मुख्य पुजारी प.पू.श्री दत्त पुरी महाराज यांनी केले आहे.




