लोहा| राजकारणात जय- पराजय’ होतच असतो, ते विसरून नेता पुन्हा जनतेच्या दरबारात जात असतात. जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच लोहा – -कधार’ अग्रस्थानी राहिले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण व माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भोवतीच गेली तीन दशक जिल्ह्याचे राजकारण फिरते आहे. पण तीन महिण्यापूर्वी अशोकराव’ भाजपात आले आणि या दोन्ही नेतृत्वान समेट’ झाला. पण तो’ जनतेला ” आवडला नाही हेच निकालातून स्पष्ट दिसले. १९७७ नंतर भाई धोंडगे सलग दुसन्यांदा लोकसभेत जाऊ शकले नाहीत. ३४ वर्षानंतर त्याचीच पुनरावृत्ती झाली असून, मन्याड खोऱ्यातील नेतृत्व प्रतापरावांनाही दुस-यांदा’ लोकसभेत जाण्यास अपयश आले आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघात २००९ पूर्वी” कंधार (आताचा लोहा) विधानसभा मतदार संघाचा समावेश होता. १९७७ मध्ये आणीबाणीच्या काळात शेकापक्षाचे नेते भाई केशवराव धोंडगे यांनी नांदेड लोकसभा, निवडणूक लढविली. त्यांना २ लक्ष ५३ हजार ५३६ मते मिळाली. तर काँग्रेसचे गो. रा. म्हैसेकर यांना १ लक्ष १९ हजार ९१६ मते पडली होती. १ लक्ष ३३ हजार ८२० मतांनी भाई धोंडगे निवडून आले होते. त्याचा विजय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला गेला. पण सलग दुसऱ्यांदा म्हणजे १९८० मध्ये ते पुन्हा लोकसभेसाठी रिंगणात उतरले, त्यांची लढत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विरुद्ध होती. त्यांना भाई धोंडगे यांना १ लक्ष ५७ हजार०१० तर डॉ. शंकरराव चव्हाण यांना १ लक्ष ९५ हजार ४६८ मते मिळाली. भाई केशवराव यांचा ४७ हजार ५४२ मतांनी पराभव झाला. दुसऱ्यांदा लोकसभेत जाण्याची त्यांची संधी हुकली.
मन्याड खोन्यातील खंबीर नेतृत्व प्रतापराव पाटील चिखलीकर यानी २०१९ नांदेड लोकसभा लढविली ( लोहा विधानसभा लातूर मध्ये आहे) त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचा प्रतापरावांनी ४० हजार मतांनी पराभव केला. त्यांचा ४ लक्ष ८६ हजार तर अशोकरावांना ४ लक्ष हजार ४६ लक्ष हजार ८०४ मते पडली होती. २९ वर्षानंतर भाई धोंडगे यांच्यानंतर भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर याना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. पण सलग दुसन्यांदा दिल्ली’त जाण्याचा योग जसा भाई धोंडगे यांच्या राजकीय कारकिर्दीत नव्हता तसाच प्रतापरावांच्या आला नाही. नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी ५८ हजार मतांनी पराभव केला. व दुसन्यांदा लोकसभेत्त जाण्यापासून रोखले. मन्याड खोऱ्यातील नेत्याला ३४ वर्षानंतर सलग दुसन्यांदा लोकसभेत जाण्यास यश आले नाही. तेव्हा ही’ चव्हाण’ यांनीच पराभूत केले आणि ‘आता ‘ही’ चव्हाण’ यांनीच ‘ पराजय केला ‘ हा तसा’ योगायोग’ होय.