उस्माननगर| येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष ॲड.संघरत्न गायकवाड यांनी पक्षात केलेल्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुनिल मगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक सचिव म्हणून निवड केली आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.


नांदेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते ॲड.संघरत्न गायकवाड यांची १० आकटोबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून प्रा सुनिल मगरे यांनी निवड केली होती. शहराध्यक्ष ॲड.संघरत्न गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाचे संघटक व पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले. नांदेड शहरातील सर्व भागात पक्षाचे संघटन वाढवून सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष ॲड.संघरत्न गायकवाड यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे केली. त्यामुळे त्यांच्या कामांची दखल घेऊन त्यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला.

सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुनिल मगरे यांना ॲड.संघरत्न गायकवाड यांची प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी देण्याची सुचना केली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष प्रा सुनिल मगरे यांनी ॲड.संघरत्न गायकवाड यांची सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र संघटन सचिव म्हणून पदोन्नती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुनिल मगरे यांच्या आदेशानुसार त्यांची निवड केली आहे.

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते ७ मार्च २०२५ रोजी एका विशेष कार्यक्रमात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ॲड.संघरत्न गायकवाड यांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यांच्या निवडीचे माजी आमदार मोहन आण्णा हंबर्डे, अविनाश घाटे, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, बाळासाहेब रावणगावकर, शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांच्यासह अनेकांनी स्वागत केले आहे.