Adv. Sangharatna Gaikwad : राकाँच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश संघटक सचिवपदी ॲड.संघरत्न गायकवाड
उस्माननगर| येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष ॲड.संघरत्न गायकवाड यांनी पक्षात केलेल्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुनिल मगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक सचिव म्हणून निवड केली आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.
नांदेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते ॲड.संघरत्न गायकवाड यांची १० आकटोबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून प्रा सुनिल मगरे यांनी निवड केली होती. शहराध्यक्ष ॲड.संघरत्न गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाचे संघटक व पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले. नांदेड शहरातील सर्व भागात पक्षाचे संघटन वाढवून सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष म्हणून च...
