लोहा| नांदेड लोकसभा मतदार संघात प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. थोडी तीस -चाळीस हजार मतांची मेहनत घेतली असती तर साहेब खासदार झाले असते अशी भावना कार्यकर्त्यांची झाली असून, आपण केलेला हलगर्जीपणा आपल्यासाठीच त्रासदायक ठरले आहे. याची जाणीव झाल्यानंतर कार्यकर्ते खडबडून जागे झाले आहेत. त्यांनीं लोहा विधानसभा मतदार संघात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली असून, पत्रकार परिषद घेऊन सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील व माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड मध्ये पराभूत झाल्या नंतर त्यांनी विधानसभा निहाय आढाव बैठका घेतल्या. आपल्या होम पिचवर लातूर लोकसभा मतदार संघाचा आढावा तसेच कार्यकर्त्यांशी २४ जून रोजी ते मुक्त संवाद साधणार आहेत. त्याचे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व पाहता लोहा मतदार संघात निवडणूक पुन्हा निवडणूक लढवावी अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. त्यादृष्टीने लोहा कंधार तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रतापराव पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी २४ जून सोमवारी विक्की गार्डन पारडी येथे सकाळी अकरा वाजता रसाळी भोजनाचा बेत आयोजित करण्यात आला आहे.
यात प्रतापराव पाटील काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पाच वर्षात खासदार म्हणून काम करताना या भागात संपर्क कमी होऊ दिला नाही पण पाच वर्षात येथील विद्यमान आमदार जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यात यशस्वी ठरले नाहीत तसेच पाच वर्षात विरोधी पक्ष व कार्यकर्ते “कोमात”गेले त्यांनची राजकीयदृष्या फारशी कोणी दाखल घेतली नाही. या मतदार संघाचे राज्याच्या नकाशावर नाव होते ते या पाच वर्षात चर्चेत राहिले नाही. असा सर्व घडामोडीत प्रतावरावांचा पराभव लोहा -कंधार तालुक्यासाठी मोठा राजकीय धक्का होय. ज्या गावाने कमी मते दिले तेथील ग्रामस्थांना आताच पश्चाताप होतो आहे.
माजीं खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा कंधार मतदार संघातून विधानसभा लढवावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने पत्रकार परिषदेत माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे व माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी प्रातिनिधिक स्वरूपात केली आहे. यावेळी भायुमो उपाध्यक्ष बंडू पाटील वडजे, माजी पं.स. सदस्य प्रल्हाद पाटील फाजगे, माजी नगरसेवक नारायण येलरवाड, भाजपा ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष अर्जुन भाऊ राठोड, सरपंच प्रदीप पाटील फाजगे ,रमेश राठोड,बाळू पाटील पवार, संभाजी पवार, आदी उपस्थित होते.