नांदेड। नांदेड तालुक्यातील पोस्टे रामर्तीथ हद्यीतील खुन प्रकरणातील अनोळखी पुरुष जातीचे प्रेताची ओळख पटवुन अज्ञात आरोपीचा शोध घेवुन, स्थानिक गुन्हे शाखा नांदेडने अटक करून खुनाचा गुन्हा उघड केला आहे, या कार्यवाहीचं पोलीस पथकाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 02/11/2024 रोजी पोलीस ठाणे रामर्तीथ हद्दीत गागलेगाव शिवार पाझर तलावा जवळ गायरान जमिनीवर एक अनोळखी इसमाचे प्रेत त्याचे शरीरावर जखमा असलेल्या स्थितीत आढळुन आले होते. सदर प्रकरणी पोलीस ठाणे रामर्तीथ येथे गुरनं. 275/2024 कलम 103 बि.एन. एस प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक यांचे आदेशाने आम्ही स्वतः सोबत, पोउपनि सोनकांबळे व स्टाफ असे तात्काळ घटनास्थळाला भेट देवुन मयताचे प्रेताची बारकाईने पाहणी करुन मयताचे अंगावरील कपडे व इतर खाणा खुना पाहुन खबऱ्या मार्फत अधिकची माहिती घेतली असता सदर गुन्हयातील मयताचे नाव विठ्ठल दत्ता पातेवार वय 30 वर्ष रा पिंपळगाव ता. नायगांव जिल्हा नांदेड असे असल्याची खात्री झाली तसेच मयत व इसम नामे इस्माईल खाजमियाँ कुरेशी वय 35 वर्ष रा. पिंपळगाव ता नायगाव जि नांदेड यांच्या दोघात बरेच दिवसापासुन आपसात वादा वादी होत होती अशी गोपणीय माहिती मिळाली.
त्यावरून आज दिनांक 07/11/2024 रोजी पिंपळगाव ता. नायगाव येथे जावुन इसम नामे इस्माईल खाजमियाँ कुरेशी वय 35 वर्ष रा पिंपळगाव ता नायगाव जि नांदेड हा मिळून आला त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली. आरोपीने गुन्हयात वापरलेली मोटार सायकल दिल्याने जप्त करण्यात आली. सदर टिमचे मा. पोलीस अधिक्षक साहेब,नांदेड यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबाबत कौतुक केले आहे.