उस्माननगर , माणिक भिसे। शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भावी आमदार एकनाथ दादा पवार यांचे उस्माननगर येथील चौकात फळ फटक्याची आतीशबाजी करून भव्य सत्कार करण्यात आला .
नांदेड येथून लोह्याकडे मोटारसायकलच्या ताफ्यासह मतदारसंघातील कार्यकर्त्याना व मतदारांची सदिच्छा भेटी गाठी दरम्यान उस्माननगर चौकातून लोह्याकडे जाताना येथे स्वागत करण्यात आले. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख संदीप पाटील काळम उप तालुकाप्रमुख हनुमंत पोकले , युवा सेना उपतालुकाप्रमुख विलास गिरी , सर्कल प्रमुख दादाराव पाटील मोरे , युवा सेना शिराढोण सर्कल प्रमुख संतोष पाटील घोरबांड , लक्ष्मीकांत पाटील घोरबांड ,गणप्रमुख संतोष कपाळे , हळदा गणप्रमुख बळवंत पाटील शिंदे ,
शिराढोण शाखाप्रमुख शिवा भुरे , शिराढोण तांडा शाखाप्रमुख सुदाम पवार , सोशल मीडिया सर्कल प्रमुख संदीप पवळे चिखलीकर , शिराढोण येथील युवा कार्यकर्ते भीमाशंकर कंधारे माधव करंडे मनोज कांबळे तांडा येथील बाबू आडे रवी पवार लाडका येथील ओमकार पाटील शिंदे भुतेचेवाडी येथील निरंजन जमदाडे उस्माननगर येथील शिवाजी पाटील काळम संतोष पाटील कळम अंकुश घोरबांड बापूजी घोरबांड शाम कळम वैभव कळम कृष्णा काळम इलाज भाई फकीर जावेद शेख विठ्ठल माली पाटील हनुमंत मोरे व असंख्य कार्यकर्त्यांच्या हस्ते एकनाथ दादा पवार यांचे सत्कार करण्यात आला.