नांदेड l नांदेड हैदराबाद महामार्गावरील जवाहर नगर येथे सुपारीने भरलेला मालवाहू ट्रक अचानक पलटी होऊन ट्रक मधील सुपारीचे पोते रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यामुळे रस्त्यावरील नागरिकांकडून होणारी सुपारीची लूट टळली.


नांदेड हैदराबाद महामार्गावरून हैदराबादकडे सुपारीने भरलेला ट्रक जात असताना जवाहर नगर येथे रविवार २२ जुने रोजी सकाळी १० वाजता अचानक पलटी झाला. त्यात सुपारीचे पोते होते हे सुपारीचे पोते रस्त्यावर पडले तसेच ट्रकमधील किन्नरला किरकोळ मार लागला असून चालक ट्रक सोडून पसार झाला असल्याचे पहावयास मिळाले.

रस्त्यावर पडलेले ट्रकमधील सुपारीचे पोते परिसरातील नागरिकांच्या नजरेस आले असता त्या पोट्यांची लयलूट झाली असती परंतु घटनास्थळी ताबडतोब पोलीस पोहोचल्यामुळे सुपारीची लयलूट थांबली आणि ट्रक तसेच ट्रकमधील सुपारीला संरक्षण मिळाल्याने अनर्थ टळला.



