नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सतत पेट्रोलिंग करुन वाहने चेक व हॉटेल लॉजेस चेकींग करुन अवैध रित्या पैसे बाळगणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने आगामी निवडणुक संबंधाने दिनांक 15/11/2024 पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड गुन्हे शोभ पथकाचे पोलीस उप निरीक्षक विनोद देशमुख, पोलीस उप निरीक्षक नरेश वाडेवाले, पोहेकॉ/2364 नागेश वाडीयार, पोहेको/818 प्रदिप गर्दनमारे, पोकों/2602 मारोती मुसळे, पोकों/2665 सुरेश हासे असे पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल चेक करीत असतांना 19.30 वाजताचे सुमारास मिन्ट हॉटेल छत्रपती चौक नांदेड येथील स्वागत कक्ष येथे दोन ईसम संशयीत रित्या बसलेले मिळून आल्याने त्यांची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यांचे ताब्यात एकुण 1,30,000/- रुपये अशी रोख रक्कम मिळुन आली. सदर रक्कम कशाची आहे या बाबत सदर दोन्ही व्यक्तीना विचारले असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. म्हणून सदर रक्कम पंचासमक्ष जप्त करुन निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा केली आहे.
वरील सर्व कारवाई मध्ये FST, IT इत्यादी संबधीत एंजन्सीना सुचीत केले आहे. तसेच निवडणुक आयोगाच्या पीएस आणि इएसएमएस पोर्टल मध्ये सदर जप्तीची नोंदी करण्यात आल्या आहेत. सदर रक्कमे बाबत संबधीत एजन्सीज या पुढील चौकशी करुन योग्य ती कार्यवाही त्यांचेकडुन केली जाणार आहे.
भाग्यनगर पोलीसाकडुन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 1,30,000/-रुपये नगदी रक्कम जप्त केले आहे. सदरची कामगीरी हे अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती किरितीका सि.एम, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उप विभाग नांदेड शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड प्रभारी अधिकारी रामदास शेंडगे व त्यांच्या पथकाने केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिंनदन केले आहे.