नवीन नांदेड l सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी वाढदिवसाचा निमित्ताने शालेय विद्यार्थीना साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासत हे केलेले कार्य विघायाक असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांनी राहेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप प्रसंगी केले.


बालाजी पाटील भायेगावकर सरपंच प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवस 8 जुलै रोजी साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळा राहेगाव,भायेगाव, किक्की, तुप्पा,कांकाडी,जवाहार नगर येथे शालेय साहित्य चे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे हे बोलत होते , वाढदिवसाच्या निमित्ताने हा केलेला उपक्रम अभिनंदनीय असल्याचे सांगितले.


नांदेड दक्षिणेचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या सुविद्य पत्नी सरस्वतीताई आनंदराव पाटिल बोंढारकर, भायेगाव सरपंच सौ.सविता बालाजी खोसडे ,संभाजी पाटील जाधव व भायगावचे पोलीस पाटील नंदू पाटील,राहेगाव पोलीस पाटील प्रतिनीधी संजय इंगळे ,तुप्पायाचे माजी ऊपसरपंच प्रतिनिधी बबन पाटील कदम,सुरेश पाटील वांगीकर ,दत्ता पाटील कदम ,पप्पू पाटील कदम,बालाजी पाटील कोल्हे,रवि थोरात यांच्या सह अनेक गावांतील सरपंच, ऊपसरपंच व तंटामुक्त अध्यक्ष,वरील सर्व शाळेतील शिक्षकवृद्ध, विद्यार्थी व सर्व मित्रपरिवार व गावकरी मंडळी उपस्थित होते.




