नांदेड। पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड आदेशाने बकरी ईद संबंधाने सर्तक पेट्रोलिंग करुन रेकॉर्ड वरील आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवणे करीता, पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता आदेशीत केले होते.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन वरुन उप विभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकों / चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे पोहेकों / राजेद्र सिटीकर यांनी दिनांक 17/06/2024 रोजी 13.45 वाजताच्या सुमारास वाजेगाव ग्रामपंचायत समोरील रोडवर वाजेगाव नांदेड येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकून आरोपी नामे शेख महेबुब ऊर्फ गोरु पि. बाबु वय 23 वर्षे व्यवसाय बेकार रा. बिलाल मस्जिद जवळ वाजेगाव नांदेड यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातील विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले 01 गावठी पिस्टल व 02 जिवंत काडतुस मिळुन आल्याने ते जप्त केले आहेत.
यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण गुन्हा नोंद क्रमांक 491/2024 कलम 3/25,7/25 शत्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सपोनि श्री सचिन गढवे करत आहेत. तसेच दिनांक 17/06/2024 रोजी 15.50 वाजताच्या सुमारास वाजेगाव बासपास नविन ब्रिज खाली नांदेड येथे मिळालेल्या गोपिनीय माहितीवरुन छापा टाकुन आरोपी नामे प्रेमसिंघ धरमसिंघ रामगडीया वय 23 वर्षे व्यवसाय बेकार रा. शिखार घाट ता. मुदखेड जि. नांदेड यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातील विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले एक खंजर मिळुन आल्याने ते जप्त केले आहे.
यावरुन पोलीस स्टेशन ग्रामिण गुन्हा नोंद क्रमांक 492/2024 कलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोहेका / रामकिशन मोरे हे करीत आहेत. सदर कार्यवाही बाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड व ईतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा यांचे कौतुक केले आहे.