हिमायतनगर। तालुक्यातील मौजे टेम्भी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील तीन बैग सोयाबीन चा ढग कुणीतरी अज्ञातांनी जाळून टाकला आहे. ही घटना दिनांक 14 ऑक्टोंबर सोमवार रात्री 12 च्या दरम्यान घडली. यामुळे शेतकऱ्यांच दीड लाखाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात महिला शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यंदा निसर्गाच्या दृष्ठ चक्राने शेतकरी हवालदिल झाला असताना उर्वरित सोयाबीन काढून ठेवला. दरम्यान कुणीतरी अज्ञातांनी शेतातील तीन बॅग सोयाबीनचा ढग मध्यरात्रीच्या वेळी जाळून टाकून नुकसान केले आहे. अशी पोस्ट शेतकऱ्याचा मुलगा लक्ष्मण मारुती टेकाळे टेंभीकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून नीच प्रवृत्तीच्या गावातील लोकांनी, सोयाबीन जाळून टाकला असल्याचा आरोप केला आहे.
तीन बैग मध्ये 27/28 क्विंटल सोयाबीन होईल असा अंदाज होता असा एकूण अंदाजे 1,50,000/- रुपयाची नूकसान झाली आहे. शेतकरी बांधव आपल्या शेतातील पिकाची लहान लेकरा सारख वाढवून घाम गाळून उत्पन्न घेतो, मात्र काही नीच प्रवृत्तीच्या लोकानी आमच्या हात तोंडातील घास काढून टाकत आहे. अशा या लोकांना समाजामध्ये कुठे जागा मिळेल. आज ही घटना माझ्यासोबत घडली उद्या दुसऱ्या कोणत्या शेतकऱ्यांसोबत घडू शकते. यांना चांगली अक्कल घडवली पाहिजे असेही शेतकरी युवकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून संताप व्यक्त केला आहे. तसेच अज्ञात व्यक्तीने शेतीतील सोयाबीनच्या गंजीला आग लावून नुकसान केल्याची तक्रार महिला शेतकरी मंजुळाबाई टेकाळे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात दिली असून, घटनेचा तपास पोलीस करत आहेत.