HomeनांदेडPilgrimage Kaleshwar Temple : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने...

Pilgrimage Kaleshwar Temple : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम -NNL

नवीन नांदेड| नांदेड शहरापासून जवळच असलेल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात श्रावण मास निमित्ताने ५ ऑगस्ट पासून पहिल्या सोमवार निमित्ताने व श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व दैनंदिन महाप्रसाद आयोजन करण्यात आले असून, दैनंदिन रात्री १ ते ५ महा अभिषेक , संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली असून भाविक भक्तांसाठी विशेष पास व दर्शन सुलभ होण्यासाठी दर्शन रांग यासह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून दुचाकी व तिन चाकी, चारचाकी वाहनासाठी वाहनतळ व पिण्याच्या पाण्याचा व्यवस्था व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काळेश्वर मंदिर विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने सुरूवात पहिला सोमवार ५ आगस्ट रोजी असुन, दुसरा १२,तिसरा १९ , चौथ्या २६ व पाचवा सोमवार २ सप्टेंबर रोजी असल्याने व श्रावणात पाच सोमवार यावर्षी आल्याने भाविक भक्तांची होणारी दर्शन साठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता दर्शन साठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक कुंभार व विश्वस्त समिती पदाधिकारी यांच्या कडून आढावा घेऊन बंदोबस्त संदर्भात चर्चा करून दर्शन रांग व मंदिर परिसर पाहणी केली.

श्रावण महिन्यात पहिल्या सोमवार ५ आगस्ट रोजी सकाळी विश्वस्त समिती अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते व पुजारी रामेश्वर लिंगप्पा धामणे स्वामी, सतिश धनमणे स्वामी, राम धनमणे,यांच्या विधीवत व मंत्रोच्चाराने महा अभिषेक,महा पुजा, महा आरती तर सायंकाळी गोदावरी माता नदीच्या काठावर महाआरती व काळेश्वर मंदिरात संध्याकाळी आरती आयोजित करण्यात आली असून व दैनंदिन श्रावणमास मध्ये दुपारपासून भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले असून श्रावणमासा महिनाभर व सोमवार निमित्ताने होणारी भाविक भक्तांची गर्दी पाहता वाहनतळ यासह भाविक भक्तांसाठी पिण्याचे पाणी, दर्शन रांग यासह सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असून ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक, महिला पोलीस कर्मचारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यासह अधिकारी यांच्यी नेमणूक करण्यात आली आहे तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुंभार यांनी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक कर्मचारी नियुक्त
केले आहेत.

मंदिर परिसरात विविध देवतांची फोटो, मुर्ती व फुले, यासह पुजेसाठी लागणारी दुकाने तर खेळणी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दुकाने लावण्यात आली आहे. श्रावणात पंचक्रोशीतील नांदेड दक्षिण, उत्तर, यासह लोहा, कंधार, गंगाखेड, तालुक्यातील अनेक भाविक भक्त दर्शन साठी मोठया प्रमाणात येत असतात, यावर्षी पाच श्रावण सोमवार आल्याने विश्वस्त समिती यांच्या मार्फत भाविक भक्तांसाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, विश्वस्त समितीचे कोषाध्यक्ष ऊतमराव हंबर्डे, सचिव शंकरराव हंबर्डे, बालाजीराव हंबर्डे, यांच्या सह पदाधिकारी पोलीस पाटील प्रविण हंबर्डे, सेवादार सतीश भेंडेकर हे विविध सुविधा बाबत आढावा घेत असुन अनेक कामाची जबाबदारी सेवेकरी व गावातील युवक यांच्या वर टाकण्यात आली आहे.

३ आगस्ट रोजी ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुंभारे यांनी श्रावणमास निमित्ताने काळेश्वर मंदिर परिसरात पाहणी करून आढावा घेतला यावेळी विश्वस्त समिती पदाधिकारी बालाजी हंबर्डे व सेवेकरी सतिश भेडेकंर वाचक शाखेचे पोलीस कर्मचारी बालाजी दंतापंल्ले व वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments