Pilgrimage Kaleshwar Temple : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम -NNL
नवीन नांदेड| नांदेड शहरापासून जवळच असलेल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात श्रावण मास निमित्ताने ५ ऑगस्ट पासून पहिल्या सोमवार निमित्ताने व श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व दैनंदिन महाप्रसाद आयोजन करण्यात आले असून, दैनंदिन रात्री १ ते ५ महा अभिषेक , संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली असून भाविक भक्तांसाठी विशेष पास व दर्शन सुलभ होण्यासाठी दर्शन रांग यासह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून दुचाकी व तिन चाकी, चारचाकी वाहनासाठी वाहनतळ व पिण्याच्या पाण्याचा व्यवस्था व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काळेश्वर मंदिर विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने सुरूवात पहिला सोमवार ५ आगस्ट रोजी असुन, दुसरा १२,तिसरा १९ , चौथ्या २६ व पाचवा सोमवार २ सप्टेंबर रोजी असल्याने व श्रावणात ...
