Ms. Ishita Sachin Kasliwal qualified for CE । कु.ईशिता सचिन कासलीवाल ठरली सिए साठी पात्र ; प्रतिथयश कासलीवाल कुंटूबिंयातली पहीली चार्टेड अंकाऊंटंट -NNL

नांदेड। शहरातील प्रसिदध व्यावासायिक कुंटूब असलेल्या कासलीवाल परिवारातील कुं इशिता सचिन कासलीवाल हीने स्वयंप्रेरणेतून आणि जिद्दीने चार्टेड अंकाऊंटंट हे क्षेत्र करीअराठी निवडत कासलीवाल कुंटूबियांमधली पहीली वहीली सिए बनन्याचा बहुमान मिळविला आहे तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्याववर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रत्येक जण हा काही नव्या गोष्टी शिकत असतो. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी येईल तो संघर्ष तयार करायची त्या व्यक्तीची काटीबद्धता असते. असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीला आपल्या भाविष्याबाबत असे काही संकेत मिळतात की पुढे त्यांचे आयुष्यच बदलून जाते.देशभरातील प्रथितयश परीक्षांपैकी एक गणल्या जाणाऱ्या सीएच्या फायनल आणि इंटर परीक्षेचे निकाल गुरुवारी (दि.११ जुलै) सकाळी जाहीर झाले. यंदा या दोन्ही परीक्षांमध्ये राज्यातील विद्याथ्यांनी मोठा ठसा उमटवला असून कु.ईशिता हीने इंटर परीक्षेत आणि फायनल परिक्षेत यश मिळविले आहे.

आपल्या यशाबद्दल कु. ईशिता म्हणाली की, चांगला अभ्यास करायचा, छान परीक्षा द्यायची आणि सर्वोत्तम मार्कांनी उत्तीर्ण व्हायचे हेच स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यास करत असतो. अभ्यास करत असताना त्या अभ्यासासाठी घेतलेले कष्ट भरलेले पैसे आणि एकूणच त्यासाठी होणारी धावपळ या सगळ्या गोष्टींची जाण त्या विद्यार्थ्याला असते. यात धावपळीचं याच घेतलेल्या कष्टांच चीज झालं आहे असे वाटते..

यासोबतच केवळ अभ्यास करूनच अवस्था पण पटकावता येते असे नाही तर त्यासाठी अभ्यास करण्यासाठी पूरक असे वातावरण असणे, विद्यार्थ्याला खचू न देण्यासाठी कुटुंबाकडून पाठिंबा असणे हे देखील महत्त्वाचे आहे असे सांगतांना कु. ईशिता हीने तिच्या यशाचं श्रेय तिचं कुटुंब म्हणजेच आई,वडील, भाऊ, आणि तिची आजी यांना देते.

कु. ईशिता ही नवा मोंढा येथील प्रतिष्ठीत व्यापारी सचिन झुंबरलाल कासलीवाल यांची मुलगी असून आई शिल्पा या गृहीणी आहेत तर भाऊ जयनेश हा कॉम्प्युटर इंजिनिअर व शेअर मार्केटमधील तज्ञ आहे.

सिए होण्यासाठी पार करावे लागतात तिन टप्पे..

सिए फाऊंडेशन त्यानंतर सिए इंटरतिडीएट व सिए फायनल असे टप्पे असतात म्हणून सिए साठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले पाहिजेत: सिए फाउंडेशन, सिए इंटरमीडिएट आणि सिए फायनल. नवीन आयसिएआय योजनेंतर्गत, उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण होण्याबरोबरच विशिष्ट मॉड्यूल देखील पूर्ण करणे आवश्यक आहे. उल्लेखनीय म्हणजे, आयसीए फाउंडेशन आणि सीए इंटरमिजिएट परीक्षा आता वर्षातून तीन वेळा आयोजित केल्या जातात, तर सीए अंतिम परीक्षांची वारंवारता अपरिवर्तित राहिली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button