Homeक्राईमfake shindi | इस्लापूर शिवनी भागात बनावट शिंदीची जोमात विक्री -NNL

fake shindi | इस्लापूर शिवनी भागात बनावट शिंदीची जोमात विक्री -NNL

शिवनी गाव बनले रसायन मिश्रित बनावट शिंदी तस्करीचे केंद्रबिंदू

किनवट, परमेश्वर पेशवे| गेल्या अनेक वर्षापासून पोलिसांना हुलकावणी देऊन शेकडो लिटर रसायन मिश्रित बनावट शिंदी तयार करून त्या शिंदीची रोज विक्री शिवनी परिसरात मोठ्या प्रमाणात होत होती. त्यातच इस्लापूर पोलिसांनी नारायण रामा गौड यांच्या राहत्या घरी दिनांक 13 जुलै 2024 शनिवार रोजी छापा टाकून रसायन मिश्रित बनावट सिंधी तयार केलेले वीस पॉकेट कॅरीबॅग मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या विकण्याच्या उद्देशाने बनावट सिंधी कॅरीबॅग मध्ये मिळून आल्याने इस्लापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा एक शिवनी परिसरामध्ये शिंदी उपलब्ध असल्याचा एक पुरावाच म्हणावा लागेल.

किनवट तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो अशा या आदिवासी किनवट तालुक्यातील दऱ्या खोऱ्यात वाडी तांड्यावर राहणारे अनेक लोक व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेकाचे संसार उघड्यावर पडले आहेत तर अशा रसायन मिश्रित बनावट सिंधी पिल्याने अनेकांचे प्राण ही गेल्याचे ऐकावयास मिळते.

गेल्या अनेक वर्षापासून हजारो लिटर रसायन मिश्रित बनावट सिंधी तयार करून इस्लापूर भागातील कुपटी, झळकवाडी, तल्हारी, जलधरा, सावरगाव, सावरगाव तांडा, नंदगाव, सोनपेठ त्याचबरोबर आदिवासी वाडी तांड्यावर सरासरीत्या सिंधी पोहोचवणारे व विनापरवाना बेकायदेशीर रित्या रसायन मिश्रित बनावट सिंधी विकणाऱ्या लोकांचे लोन हे खेड्यापाड्यात पोहोचले असून शाळेतील विद्यार्थ्यांसह तरुण पिढी व्यसनाधीन झाल्याने अनेकाचे संसार उध्वस्त होऊन अनेक महिला विधवा झाल्या आहेत अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

रसायन मिश्रित बनावट शिंदी तयार करण्याचे शिवनी हे गाव केंद्रबिंदू बनले. हे आता तरी राज्य उत्पादन शुल्क व अन्न औषध प्रशासन विभागाला व पोलीस यंत्रणेला मान्य करावेच लागेल. रोज शेकडो लिटर रसायन मिश्रित बनावट शिंदी तयार करून विना परवाना बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने इस्लापूर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता त्याच्याकडे रसायन मिश्रित बनावट शिंदी तयार केलेले वीस लिटर शिंदीचे पॉकेट मिळून आले आहे असे इस्लापूर पोलिसांनी सांगितले आहे.

मागील काही वर्षापूर्वी शिवनी येथे तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी छापा टाकला असता त्यावेळेस चंद्रकांत गवळी यांनी शेकडो लिटर बनावट शिंदीच्या टाक्या जप्त करून रसायन मिश्रित बनावट शिंदी तयार करण्याचे रसायन जप्त केले होते.

मग इस्लापूर पोलिसांनी 13 जुलै 2024 शनिवार रोजी त्यांच्या घरावर छापा टाकला असता फक्त 20 लिटर रसायन मिश्रित बनावट शिंदी कॅरीबॅग मध्ये मिळून आल्याचे दाखवत इस्लापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने इस्लापूर पोलिसांविषयी शंका निर्माण केली जात आहे. इस्लापूर शिवनी जलधरा भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात शिंदीचे पॉकिट खुलेआमपणे विक्री केली जाते मग ही शिंदी कुठून येते असाही सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.

इस्लापूर पोलिसांनी शिवणी येथील रसायन मिश्रित बनावट शिंदी तयार करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकली असता वीस लिटर रसायन मिश्रित सिंधी जप्त करून चारशे रुपयाचा मुद्देमाल दाखवत गुन्हा दाखल केल्याने “खोदा पहाड और निकला चुवा” अशी परिस्थिती दिसून आल्याने या परिसरात इस्लापूर पोलिसांविषयी उलट सुलट चर्चेला आता उधाण आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments