fake shindi | इस्लापूर शिवनी भागात बनावट शिंदीची जोमात विक्री -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| गेल्या अनेक वर्षापासून पोलिसांना हुलकावणी देऊन शेकडो लिटर रसायन मिश्रित बनावट शिंदी तयार करून त्या शिंदीची रोज विक्री शिवनी परिसरात मोठ्या प्रमाणात होत होती. त्यातच इस्लापूर पोलिसांनी नारायण रामा गौड यांच्या राहत्या घरी दिनांक 13 जुलै 2024 शनिवार रोजी छापा टाकून रसायन मिश्रित बनावट सिंधी तयार केलेले वीस पॉकेट कॅरीबॅग मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या विकण्याच्या उद्देशाने बनावट सिंधी कॅरीबॅग मध्ये मिळून आल्याने इस्लापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा एक शिवनी परिसरामध्ये शिंदी उपलब्ध असल्याचा एक पुरावाच म्हणावा लागेल.
किनवट तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो अशा या आदिवासी किनवट तालुक्यातील दऱ्या खोऱ्यात वाडी तांड्यावर राहणारे अनेक लोक व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेकाचे संसार उघड्यावर पडले आहेत तर अशा रसायन मिश्रित बनावट सिंधी पिल्याने अनेकांचे प्राण...
