HomeनांदेडSchool nutrition | आयएफटीयू सलग्न प्रगतीशील शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हा...

School nutrition | आयएफटीयू सलग्न प्रगतीशील शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हा परिषदवर निदर्शने आंदोलन – NNL

नांदेड| आज दि.10 जुलै 2024 रोजी प्रगतीशील शालेय पोषण आहार कामगाराचे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकारी महिलांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले.

यानिदर्शने आंदोलनात मुख्य मागण्या म्हणजे शालेय पोषण आहार कामगारास शासकिय सेवेत सामावून घ्या, नाही तर 26 हजार रूपयेदरमहा मानधन द्या, इंधन बिल त्याच्या खात्यावर अदा करण्यात यावे, शासकीय करारनामा रद्द करावा, शालेय व्यवस्थापन समिती बरखास्त करावी, शालेय पोषण आहार कामगारास दिवाळी बोनस द्या व वर्षातून दोन ड्रेस द्या.

शालेय पोषण आहार कामगारास गॅस शेगडी द्या व गॅस दुरूस्ती मॅकेनिक नेमावा, शाळा प्रांगण झाडने व झेंडा राखने बंद करावे, केळी, अंडी याचे मानधन शालेय पोषण आहार कामगाराच्या खात्यावर जमा करण्यात यावे यासह अनेक मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना निवेदन देण्यात आले.

moeXVmob School nutrition | आयएफटीयू सलग्न प्रगतीशील शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हा परिषदवर निदर्शने आंदोलन - NNL

सदरील मागण्या घेवून निदर्शने करण्यात आले आहेत. या निदर्शने आंदोलनात मोठया संख्येने सामील शालेय पोषण आहार कामगार होते. या आंदोलनातील कॉ.मारोती हारबळे, कॉ.नागोराव शिंदे, कॉ.रामदास पांचाळ, कॉ.बळीनराम गायकवाड, कॉ.सुरेखा बनसोडे, कॉ.संजय जाधव, कॉ.निता हारबळे, कॉ.देवळाबाई जाधव, कॉ.मयुराबाई गायकवाड, कॉ.गिरजाबाई दाढेल, कॉ.रेखा बोकारे आदींनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments