Homeनांदेडट्रक व दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी... NNL

ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी… NNL

दुचाकी ट्रक चालकाने फरकट नेल्यामुळे मयत यांच्या शरीराचे तुकडे झाले

नवीन नांदेड| नांदेड हैदराबाद रोडवरील चंदासिंग कॉर्नर येथील एस.बी.आय. बॅक समोर झालेल्या ट्रक व दुचाकी अपघात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना येथे कृषी सहाय्यक असलेले गंगाधर दतराम शिंदे हे जागीच मयत झाले असुन, या अपघातात सदरील दुचाकी ट्रक चालकाने फरकट नेल्यामुळे मयत यांच्या शरीराचे तुकडे झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अखेर पोलीस निरीक्षक एन. एस.आयलाने व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयतास शासकीय रुग्णालयात नेले असुन ट्रक चालकास ट्रक सह ताब्यात घेतले आहे. या मार्गावर अपघात घडल्यानंतर जाणारी येणारी वाहतूक खोळंबली होती.

ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या चंदा सिंग कॉर्नर येथे ८ जुलै रोजी दुपारी ३,३० वाजता वाजेगाव येथुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्रमांक आर.जे. ०४ जि.सी.३७८६ याने दुचाकी क्रंमाक एम.एस.२६ ,३५९४ स्वाराला दिलेल्या धडकेनंतर ट्रकने जवळपास अनेक फुट दुचाकी स्वाराला फरकटत नेल्याने मयत कृषी सहाय्यक गंगाधर दतराम शिंदे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव रा.धनेगाव ता.जि.नांदेड यांना जबर मार लागून ट्रक खाली आल्याने शरीराच्या खालच्या भाग कटल्याने दोन तुकडे होऊन चेदामेंदा होऊन गतप्राण झाले. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला असुन, पायास गंभीर मार लागल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनास्थळी मयत कृषी सहाय्यक यांच्या भाऊराव चव्हाण साखर कारखाना देगाव येळेगाव येथील कागदपत्रे विखुरलेल्या अवस्थेत फेकली गेली, घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी धाव घेतली. व आक्रोश करून संताप व्यक्त केला. घटनेची माहिती कळताच तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक एन.एस.आयलाने व उपनिरीक्षक महेश कोरे व पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन मयताचे शवविच्छेदन साठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. गंभीर जखमी संजय शंकर पायरे रा.राहेर यांच्या पायला दुखापत झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

घटनास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी नातेवाईकांना शांतता बाळगून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले व पोलीस प्रशासनास सहकार्य केले,घटनास्थळी असलेला ट्रक व ट्रक चालक यास ताब्यात घेतले असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments