नांदेड| भारत दूरसंचार निगम (BSNL) नांदेड कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने बातमीची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर त्या विभागातील संबंधित कर्मचारी, कंत्राटदार यांनी पत्रकार धनंजय सोळंके यांना आमची बातमी का घेतोस म्हणून, शिवीगाळ, धक्काबुकी करत कॅमेरा हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सदरील कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यातर्गत गुन्हा दाखल करून या विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे विविध माध्यमांच्या पत्रकारांनी केली आहे.


एम. के. एन. (MKN)मराठी व हिंदी या राष्ट्रीय वृत्त वाहिनीचे मराठवाडा ब्युरो चीफ पत्रकार धनंजय सोळंके हे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी बातमीच्या अनुषंगाने नांदेड येथील दूर संचार निगम कार्यालयात गेले असता येथील कर्मचारी व कंत्राटदार यांनी पत्रकार सोळंके यांना धक्काबुकी, शिवीगाळ करून त्यांचा कॅमेरा हिसकावून घेत फोडण्याचा प्रयत्न केला. व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले आहे. त्यांना पोलीस संरक्षण देऊन सदरील कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.



तसेच या विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या कडे पत्रकार संरक्षण समिती व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व विविध माध्यमाच्या प्रतिनिधीने एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रुपेश पाडमुख, पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जयवर्धन भोसीकर,मराठवाडा साथीचे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी हंबर्डे,मौला शेख, विजय खंदारे, अमोल बचूटे, अब्दुल गफूर,अमरदीप गोधने, दिपक जोंधळे, आनंद सोनटक्के, सूर्यवंशी यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते.




