HomeBlogविधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत -NNL

विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत -NNL

मुंबई| आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी केले आहे.

उमेदवारी अर्ज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर मुंबई येथे व सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज पक्ष निधीसह टिळक भवन दादर, मुंबई येथे सादर करावा. सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी २० हजार रुपये तसेच अनुसूचित जाती, जमाती व महिला इच्छुक उमेदवारांना १० हजार रुपये पक्षनिधी अर्जासोबत भरावा लागणार आहे. जे इच्छुक उमेदवार जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अर्ज सादर करतील त्या जिल्हा काँग्रेस कार्यालयाने १० ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे जमा झालेले अर्ज प्रदेश कार्यालयाला सादर करावेत.

मतदार याद्या अद्ययावत करण्यावर भर द्या..
मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून २५ जून ते २४ जुलै २०२४ या कालावधीत मतदारयाद्यांचे पुनरिक्षण करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकी मध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदारांची नावे यादीत आहेत का? ते पहावे. नसल्यास ती नावे पुन्हा यादीत सामाविष्ठ करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

तसेच नाव, पत्ता यात काही बदल करावयाचा असल्यास ती सर्व कामे करून मतदार यादीत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया करून घ्यावी. ज्या युवक, युवतींनी वयाची १८ वर्षे पुर्ण केलेली आहेत, त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यावरही भर द्यावा. अशी सूचना प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रातांध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments