Homeनांदेड4 ते 7 जुलै 2024 पर्यंत विविध रोगांवर फ्री मेडीकल कॅम्प व...

4 ते 7 जुलै 2024 पर्यंत विविध रोगांवर फ्री मेडीकल कॅम्प व मोफत चष्मे व आय लॅन्स शस्त्रक्रीया शिबिर -NNL

नांदेड। दि. 4 ते 7 जुलै 2024 पर्यंत विविध रोगांवर फ्री मेडीकल कॅम्प व मोफत चष्मे व आय लॅन्स शस्त्रक्रीया कॅम्प दशमेश हॉस्पीटल, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ गरजुनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तख्त सचखंड श्री हजूर अविचलनगर साहिव नांदेड, गुरुद्वारा बोर्ड, नांदेड व तेरा ही तेरा मिशन चंदीगढ यांच्या संयुक्त विद्यमाने फ्री मेडीकल कॅम्प दि. 6 व 7 जुलै 2024 रोजी दशमेश हॉस्पीटल, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये स्त्री रोग, हृदय, छाती, पोट, मुत्र रोग व औषधी विशेषज्ञ यांचे फ्री मेडीकल कॅम्प सकाळी 09 ते 01 व सायं 3 ते 5 या वेळेत होणार आहेत. या कॅम्प मध्ये प्रसिध्द डॉक्टरर्स – डॉ. हरप्रीत कौर-स्त्री रोग व प्रसुती तज्ञ, डॉ. करणदीप सिंघ हृदयरोग विशेषज्ञ, डॉ. जैम जैस आहलूवालिया छाती रोग तज्ञ, डॉ. गुरसिमरन सिंघ औषधी तज्ञ, डॉ.टी.पी. सिंघ – पोट विकारां चे विशेषज्ञ, डॉ. हरप्रीत सिंघ मुत्र रोग विशेषज्ञ यांची उपस्थिती राहणार आहे.

तसेच दि. 4 ते 6 जुलै 2024 पर्यंत ऑय कॅम्पचे आयोजन सुध्दा होणार आहेत. या कॅम्पमध्ये सुप्रसिध्द नेत्र सर्जन व पुर्व पी.जी.आय. चंदीगढ डॉ. रोहित गुप्ता हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. तसेच या कॅम्पमध्ये गरजूंचे मोफत डोळ्यांचे ऑपरेशन लॉयन्स आय हॉस्पीटल, सिडको येथे मोफत

होणार आहेत यावेळी गरजुंना मोफत चष्मे सुध्दा वाटप करण्यात येणार आहेत. या कॅम्पला संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश गुरुद्वारा वोर्डचे प्रशासक डॉ. विजय सतविर सिंघ (पुर्व आय.ए.एस.) यांनी गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक यांना दिले व त्यांच्या सहकार्यासाठी स्टाफ सुध्दा देण्याचे निर्देश दिले आहेत. तरी सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे कि, त्यांनी या सर्व कॅम्पचा घ्यावा.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments