Homeनांदेडहिमायतनगरात उंच पाण्याच्या टाकीवर काम करताना खाली पडून मजुराचा दुर्दैवी अंत

हिमायतनगरात उंच पाण्याच्या टाकीवर काम करताना खाली पडून मजुराचा दुर्दैवी अंत

संतोष ठोके यांचा तोल गेला; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू

हिमायतनगर, प्रतिनिधी | शहरातील सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम सुरू असताना घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका मजुराचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी संतोष श्रावण ठोके (वय ४०, रा. देवाचाळ, नांदेड) हे मजूर काम करीत होते. काम सुरू असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते जलकुंभाच्या उंच भागावरून खाली कोसळले.

उंचावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हिमायतनगर ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

IMG 20260830 WA0010 हिमायतनगरात उंच पाण्याच्या टाकीवर काम करताना खाली पडून मजुराचा दुर्दैवी अंत

दरम्यान, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे काम करताना मजुरांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न या दुर्घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. उंचावर काम करणाऱ्या कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने व खबरदारी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या घटनेमुळे ठोके यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शासन व संबंधित यंत्रणांनी त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments