Homeनांदेडनेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा

नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा

नांदेडl नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण अथवा हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या क्रमांकांवर साधा संपर्क

जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, नांदेड
☎️ 02462-235077
☎️ 1077 (टोल फ्री)

आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत सुरू आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नेपाळमध्ये प्रवासासाठी गेलेल्या आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्यास नातेवाईकांनी विलंब न करता उपलब्ध तपशीलांसह आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments