HomeकरियरEducation : उपशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांचे शिक्षण क्षेत्रातील मोठे योगदान मनपा आयुक्त...

Education : उपशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांचे शिक्षण क्षेत्रातील मोठे योगदान मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांचे प्रतिपादन

नांदेड| बालाजी शिंदे यांनी कॉपीमुक्तीसारख्या व संकल्प शिष्यवृत्ती अभियानात पडद्यामागून मोठे काम केले. मनपाचे शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी शहरातील शिक्षण व्यवस्थेला आकार देण्यासाठी स्वतःस झोकून दिले होते. त्यांची मनपातील अल्पकाल असलेली सेवा कायम स्मरणात राहणारी ठरली. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केले त्या त्या ठिकाणी स्वतःच्या कामाचा ठसा उमटविला. उपशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन नांदेड मनपाचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी केले.

परभणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांच्या सेवा गौरव सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे, नंदन नांगरे, माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, भाजपाचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, शिक्षणाधिकारी माधवराव सलगर, सौ. डॉ. सविता बिरगे, भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा संयोजक संतोष पांडागळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना डॉ.डोईफोडे यांनी बालाजी शिंदे यांच्या महानगर पालिकेतील शिक्षणाधिकारी पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा घेतला. महापालिकेतून त्यांची सेवानिवृत्ती व्हावी अशी आपली इच्छा असल्याचे बोलून दाखवित बालाजी शिंदे सारख्या कल्पक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ.गोविंद नांदेडे, नंदन नांगरे, बालाजी पांडागळे, डॉ. सविता बिरगे, माधव सलगर, व्यंकटेश शिंदे, अपेक्षा शिंदे , आकाश शिंदे, ज्योती शिंदे यांची बालाजी शिंदे यांच्यावर गौरवपूर्ण भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पांडागळे यांनी केले. तर सूत्रसंचालन दत्तप्रसाद पांडागळे यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा.शिवकुमार भुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक परिषदेचे प्रदेश प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे ,प्रा.शिवकुमार भुरे,शिवलिंग गाजेवार,बालाजी नरंगले यांनी पुढाकार घेतला.या सेवागौरव सोहळ्यास शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांसह शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments