HomeकृषीDistrict Collector Rahul Kardile : पीक नोंदणीसाठी सहायकांना सहकार्य करा – जिल्हाधिकारी...

District Collector Rahul Kardile : पीक नोंदणीसाठी सहायकांना सहकार्य करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

ई-पीक पाहणीसाठी नाळेश्वर व लिंबगाव मंडळातील शिवारात जिल्हाधिकाऱ्यांची भेट

नांदेड| ई-पीक पाहणी (DCS) हा शासनाचा महत्त्वपूर्ण व प्राधान्यक्रमाचा प्रकल्प असून त्याची १०० टक्के प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा त्रास कमी करून सातबारा उताऱ्यावरील पिकांची ऑनलाइन नोंद अचूकपणे व्हावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या सहायकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

खरीप हंगाम २०२६-२७ पासून डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी केली जात आहे. ११ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. गट व सर्वे क्रमांकनिहाय प्रत्यक्ष पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून पीक नोंदणी अद्ययावत केली जात आहे. या माहितीचा उपयोग विविध कृषी योजना, पीकविमा, आपत्ती मदत, कृषी सांख्यिकी तसेच ॲग्रीस्टॅकसाठी केला जाणार आहे.

ई-पीक नोंदणीचे महत्त्व व आवश्यकतेबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज नाळेश्वर मंडळातील सोमेश्वर आणि लिंबगाव मंडळातील वरखेड शिवाराला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करून शेतकऱ्यांना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६३९ सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे कर्मचारी, CSC चालक तसेच ग्रामस्तरावर मानधन तत्त्वावर कार्यरत अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी तहसीलदार विपीन पाटील, मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, मधुकर फुलवळे, ग्राम महसूल अधिकारी गजानन वळगे, महेश जोशी, मारोती कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

e pil 1 District Collector Rahul Kardile : पीक नोंदणीसाठी सहायकांना सहकार्य करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना – ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून गावांचे काम वाटप अर्थात टास्क अलोकेशन तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. टास्क अलोकेशन करताना गावाच्या नकाशानुसार प्रत्यक्ष पाहणी करून सहायकांना सोयीचे होईल, याची खात्री करूनच गटांचे वाटप करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सहायकांनी स्थळभेटीपूर्वी मोबाईल ॲप रेंज असलेल्या ठिकाणी रिफ्रेश अथवा अपडेट करून त्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments