Homeनांदेडगावागावात उद्योजक निर्माण करणे ही काळाची गरज : आमदार बाबुराव कदम कोहळीकर

गावागावात उद्योजक निर्माण करणे ही काळाची गरज : आमदार बाबुराव कदम कोहळीकर

मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण शिबिरात पशुधन विकास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

हदगाव, हिमायनगर, नांदेड, प्रतिनिधी| गावागावात छोटे-छोटे उद्योजक निर्माण करून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन युवक, शेतकरी व गरजू नागरिकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे, असे आवाहन हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले.

हदगाव येथे आयोजित मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. लवकरच सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन विकास योजनेच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील इच्छुक उद्योजकांनी आतापासूनच तयारी करावी आणि जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

गावातील होतकरू व गरजू व्यक्तींनी पशुधन आधारित व्यवसायासाठी पुढे यावे. संगणक परिचालक तसेच सेतू सुविधा केंद्र चालकांनी इच्छुक लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासह आवश्यक प्रक्रियेत सहकार्य करावे. मतदारसंघातील नव्या उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही आमदार कदम कोहळीकर यांनी यावेळी दिली.

IMG 20260808 WA0041 गावागावात उद्योजक निर्माण करणे ही काळाची गरज : आमदार बाबुराव कदम कोहळीकर

ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा योजनांचा प्रभावी वापर होणे आवश्यक असून, प्रत्येक गावातून उद्योजक तयार झाल्यास गावांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी नायब तहसीलदार तामसाकर, हदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आडे राघो, हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, सहसंपर्कप्रमुख संभाजी लांडगे, पशुधन सहाय्यक आयुक्त डॉ. शिंदे, डॉ. हंगरगे, राज्यस्तरीय पशुधन योजना अधिकारी डॉ. मोडवान यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, संगणक चालक, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments