HomeनांदेडSenior Civil Court for Kinwat : किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र...

Senior Civil Court for Kinwat : किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह वरिष्ठ दिवाणी न्यायालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, सरकारी वकील कार्यालय तसेच वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयानुसार, यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या न्यायिक अधिकारी व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या पदांमधून या तीनही आस्थापनांसाठी आवश्यक पदे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

मंजूर पदांचा तपशील : जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय – १९ नियमित व ६ बाह्य यंत्रणेमार्फत पदे, सरकारी वकील कार्यालय – ३ नियमित व १ बाह्य यंत्रणेमार्फत पद , वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालय – २१ नियमित व ४ बाह्य यंत्रणेमार्फत पदे, याप्रमाणे, एकूण ४३ नियमित आणि ११ बाह्य यंत्रणेमार्फत अशी ५४ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे किनवट व परिसरातील नागरिकांना जिल्हा व सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालयाची सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होईल, प्रकरणांच्या निपटाऱ्याला गती मिळेल आणि नागरिकांना अधिक सुलभ, जलद व प्रभावी न्यायसेवा मिळण्यास मदत होईल. तसेच, या न्यायालयांसाठी आवश्यक न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments