Homeक्राईमHoney Trap ; महिलेसह साथीदारांकडून 'हनी ट्रॅप' रचून लाखाची खंडणी; भाग्यनगर पोलिसांची...

Honey Trap ; महिलेसह साथीदारांकडून ‘हनी ट्रॅप’ रचून लाखाची खंडणी; भाग्यनगर पोलिसांची धडक कारवाई, पाच आरोपी जेरबंद

फोटो-व्हिडिओ व्हायरल व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; ५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, प्रतिनिधी| नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला कामाच्या बहाण्याने बोलावून त्याचे फोटो व व्हिडिओ काढत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ₹1 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी एका महिलेने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधून ड्रायव्हरची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांना भाग्यनगर परिसरातील बेलानगर येथे बोलावण्यात आले. तेथे महिलेसह इतर आरोपींनी त्यांना एका घरात नेऊन जबरदस्तीने शर्ट काढण्यास भाग पाडले आणि मोबाईलद्वारे फोटो व व्हिडिओ चित्रीत केले.

त्यानंतर हे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ₹1 लाखांची खंडणी मागण्यात आली. आरोपींनी फिर्यादीच्या हातातील सुमारे 8 ग्रॅम वजनाची, अंदाजे ₹1.20 लाख किमतीची सोन्याची अंगठीही जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 405/2026 दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजंने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या नेतृत्वातील गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने अल्पावधीतच पाचही आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून, त्यांच्याकडून दोन स्कुटी, एक ऑटो, चार मोबाईल फोन आणि गुन्ह्यातील सोन्याची अंगठी असा एकूण सुमारे ₹5.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे.

नांदेड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तींच्या बोलावण्यावर एकांतस्थळी जाण्यापूर्वी खातरजमा करावी. फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments