HomeनांदेडPrivate healthcare : खाजगी आरोग्य संस्थांनी आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये नोंदणी करावी

Private healthcare : खाजगी आरोग्य संस्थांनी आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये नोंदणी करावी

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी आभा कार्ड काढण्याचे आवाहन

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट आणि इतर संबंधित कायद्यांतर्गत येणाऱ्या खाजगी आरोग्य संस्थांनी आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये रुग्णालये, क्लिनिक, डायग्नोस्टिक सेंटर, प्रयोगशाळा, मेडिकल स्टोअर, इमेजिंग सेंटर (एक्स-रे/एमआरआय) आदींचा समावेश आहे. संबंधित संस्थांनी निर्धारित कालमर्यादेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महानगरपालिका क्षेत्र, तालुका स्तर तसेच ग्रामीण भागातील सर्व खाजगी आरोग्य संस्थांनी HFR (Health Facility Registry) मध्ये, तर संबंधित संस्थांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफने HPR (Health Professional Registry) मध्ये नोंदणी करावी. या नोंदणीसाठी येणाऱ्या शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून रुग्णांची आरोग्यविषयक माहिती सुरक्षित आणि गोपनीय पद्धतीने डिजिटल स्वरूपात जतन करण्यास मदत होते. रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, जुने वैद्यकीय अहवाल, प्रिस्क्रिप्शन आणि तपासणी अहवाल डिजिटल स्वरूपात उपलब्ध होऊ शकतात. रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य संस्थांमध्ये अधिकृत व सुरक्षित पद्धतीने आरोग्यविषयक माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ही डिजिटल आरोग्य व्यवस्था उपयुक्त ठरणार आहे. रुग्णाच्या संमतीला प्राधान्य देत आरोग्यविषयक माहितीच्या सुरक्षिततेची आणि गोपनीयतेची काळजी घेतली जाते.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचे १४ अंकी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) कार्ड काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक ABHA मोबाईल अॅपच्या माध्यमातून किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन आधारकार्डच्या सहाय्याने ABHA कार्ड तयार करू शकतात.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, भारत सरकार आणि आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्याची ‘ABDM Model District’ म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांची HFR तसेच तेथील वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफची HPR नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. नागरिकांचे ABHA कार्ड तयार करण्याची कार्यवाहीही दररोज सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments