HomeनांदेडShri Parmeshwar Temple : विठ्ठल नामाच्या गजरात हिमायतनगर (वाढोणा) नगरी दुमदुमली; श्री...

Shri Parmeshwar Temple : विठ्ठल नामाच्या गजरात हिमायतनगर (वाढोणा) नगरी दुमदुमली; श्री परमेश्वर मंदिरातून भव्य नगरप्रदक्षिणा दिंडी

हिमायतनगर (वाढोणा),अनिल मादसवार| “यंदाचा खरीप हंगाम सुख-समृद्धीचा जावो, भरपूर पाऊस पडून शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पीक यावे आणि सर्वांच्या घराघरात आनंद, समाधान व समृद्धी नांदो,” अशी विठ्ठल-रुख्मिणी चरणी प्रार्थना करत आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शेकडो भाविकांनी श्री विठ्ठल-रुख्मिणी व श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पुण्यप्राप्ती केली.

श्रीक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात अनादिकालापासून आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाही देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी संप्रदायातील महिला-पुरुष भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

पहाटे ६ वाजता पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चारात विठ्ठल-रुख्मिणीचा अभिषेक सोहळा संपन्न झाला. हा अभिषेक संजय माने यांनी सपत्नीक केला. यानंतर मंदिरात आलेल्या भाविकांना केळी व राजगिऱ्याच्या लाडूंचा प्रसाद वितरित करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता परंपरेनुसार मंदिरातील भजनी मंडळाच्या वतीने भव्य नगरप्रदक्षिणा दिंडीला प्रारंभ झाला. त्यापूर्वी मंदिराच्या सभागृहात महिला-पुरुष भजनी मंडळाने हरिनाम संकीर्तन व भजनाचा कार्यक्रम सादर केला.

IMG20260725174130 01 10 Shri Parmeshwar Temple : विठ्ठल नामाच्या गजरात हिमायतनगर (वाढोणा) नगरी दुमदुमली; श्री परमेश्वर मंदिरातून भव्य नगरप्रदक्षिणा दिंडी

त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात, “विठ्ठल… विठ्ठल…” नामघोष करत शेकडो वारकरी, महिला-पुरुष, बालगोपाल आणि नागरिकांच्या उपस्थितीत नगरप्रदक्षिणा दिंडी उत्साहात पार पडली. दिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी विठ्ठल-रुख्मिणीची आकर्षक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

IMG20260725173613 01 Shri Parmeshwar Temple : विठ्ठल नामाच्या गजरात हिमायतनगर (वाढोणा) नगरी दुमदुमली; श्री परमेश्वर मंदिरातून भव्य नगरप्रदक्षिणा दिंडी
oplus_48

दिंडीने शहरातील विविध देवी-देवतांच्या मंदिरांना भेट देत नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. त्यामुळे सहभागी भाविकांना प्रत्यक्ष पंढरपूर यात्रेचा आनंद अनुभवता आला. टाळ-मृदंगाचा निनाद, भजनांचा गजर आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

नगरप्रदक्षिणेनंतर दिंडीचा समारोप श्री परमेश्वर मंदिरात भजन, आरती आणि प्रसाद वितरणाने करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात श्री परमेश्वर महिला-पुरुष भजनी मंडळ, वारकरी संप्रदायातील भाविक, शेकडो महिला-पुरुष, बालगोपाल तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments