HomeBlogसंसदेत ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा !...

संसदेत ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा ! – टी. राजासिंह, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार -NNL

गोवा| आज अनेक लोकप्रतिनिधी निवडून येण्यापूर्वी हिंदुत्वनिष्ठ असल्याचे दाखवतात; मात्र सत्तेची खुर्ची प्राप्त झाल्यावर ते धर्मनिरपेक्ष होतात. असे लोकप्रतिनिधी हिंदु राष्ट्रासाठी वा हिंदुत्वासाठी काहीही करणार नाहीत. धर्मनिरपेक्ष नेते हिंदू राष्ट्राच्या मागणीला विरोधच करतील. त्यामुळे किमान ५० हिंदुत्वनिष्ठ खासदार निवडून आणणे आवश्यक आहे, जे संसदेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करतील, असे स्पष्ट आवाहन तेलंगणा राज्यातील येथील गोशामहलचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘हिंदु राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक’ या विषयावर बोलतांना केले.

VHRM 30June Attendance संसदेत ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा ! - टी. राजासिंह, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार -NNL

आमदार श्री. टी. राजासिंह पुढे म्हणाले की, तेलंगणातील अनेक जिल्ह्यांत अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र आहे; मात्र श्रीरामनवमीच्या वेळी लाखो हिंदू भगवे ध्वज घेऊन बाहेर पडतात. त्यामुळे तेथील मुख्यमंत्र्यांनाही आमचा विचार करावा लागतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून राष्ट्राचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. प्रशासनातील मोठे अधिकारी, नेते हिंदुत्वाच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदुत्वनिष्ठ यांना त्रास दिला जातो. याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ युवकांना चांगले शिक्षण घेऊन उच्च पदांवर पोहोचण्यास साहाय्य करा, जेणेकरून ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान देऊ शकतील. येणारा काळ कठीण आहे. हिंदु राष्ट्राचे वा धर्मकार्य करायचे असेल, तर घाबरून चालणार नाही. संतांनी सांगितले आहे की, साधनेने हे वातावरण बदलता येईल. त्यामुळे अखंड हिंदु राष्ट्रासाठी साधना करणे आवश्यक आहे.

दाभोलकर हत्याप्रकरणात निर्दोष सुटका झालेले, तसेच खटला लढवणारे अधिवक्ता यांचा सत्कार !

VHRM 30June Vikram Bhave संसदेत ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा ! - टी. राजासिंह, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार -NNL
दाभोलकर हत्याप्रकरणात निर्दोष सुटका झालेले सनातनचे साधक श्री. विक्रम भावे, न्यायालयीन खटला विनामूल्य लढवणारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, अधिवक्ता (सौ.) मृणाल व्यवहारे आणि अधिवक्ता (सौ.) स्मिता देसाई यांचा भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्या हस्ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि देवतांची सात्त्विक प्रतिमा प्रदान सर्वांचा सत्कार केला गेला. या वेळी उपस्थित धर्मप्रेमी हिंदूंनी ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ या घोषणांचा जयघोष केला. या खटल्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता सुभाष झा, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता सुवर्णा वत्स-आव्हाड अधिवेशनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित नव्हत्या. या सर्वांचे वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये अभिनंदन करण्यात आले.

श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : ९९८७९ ६६६६६)

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments