आजोबासह नातवाचा जागीच मृत्यू – एकजण गंभीर


हिमायतनगर, प्रतिनिधी | भोकर हिमायतनगर महामार्गावर असलेल्या पोटा आबादी जवळ उभ्या असलेल्या ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात झाला असुन या घटनेत दुचाकी चालक आजोबा व नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या अपघातातील एकजण गंभीर असलेल्या सहा वर्षीय मुलास उपचारासाठी नांदेड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एका चिमुकल्या बालकांचा अपघातात मृत्यू झाला असुन या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.


हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी असलेले बालाजी गंगाराम नाचारे वय (50) आरूष रतन नाचारे, अक्षय माधव शेळके वय 06 हे तिघेजण दुचाकीवर जात असताना भर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक होऊन मोठा अपघात झाला या घटनेत दुचाकीस्वार बालाजी नाचारे व यांचाच नातू आरूष रतन नाचारे हा जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली सदरील हि घटना पोटा अबादी जवळील मनिषा आश्रम शाळेजवळ रविवारी दुपारी घडली आहे.




या घटनेतील गंभीर अक्षय माधव शेळके असल्याने त्यास उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले असुन उपचार सुरू आहेत.हिमायतगनर येथील उपजिल्हा रुग्णालयात मयत बालाजी नाचारे यांचे श्वेछदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले जवळगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.अनेक मोठ मोठी वाहने मुख्य रस्त्यावर उभे करत असल्याने अपघात घडत आहेत.

भोकर हिमायतनगर या महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या गावाजवळ गतीरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी वारंवार होत असुन देखील बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यांच्या दुर्लक्षपणामुळे अनेका़चे जिव अपघातांत जात आहेत.
पोटा ,सरसम या गावालगत महिन्यात दोन चार अपघातांच्या घटना घडत असुन अनेकांचे जिव जात आहेत.भोकर हिमायतनगर या महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या जिप,ट्रक,हायवा यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडत आहेत तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केले असल्याने मोठ मोठे अपघात घडत आहेत.
