आरोग्यनांदेड

Kidney specialist : किडनीरोग तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांची कृतज्ञता ; उपस्थितांचे डोळे पाणावले

किडनीदाते व जीवनदान मिळालेल्या रुग्ण-नातेवाईकांचा “आपुलकी मेळावा”; श्री गंगा हॉस्पिटलमध्ये ३०हून अधिक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

नांदेड| जागतिक किडनी दिनानिमित्त किडनीदान करून जीव वाचविणाऱ्या दात्यांचा तसेच त्यातून नवजीवन मिळालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा भावनिक “सत्कार सोहळा” उत्साहात पार पडला. हा आगळावेगळा “आपुलकी मेळावा” नांदेड शहरातील श्री गंगा हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यात किडनीदात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे डोळे पाणावले. “आज आम्ही जिवंत आहोत, जग पाहू शकतो, ते फक्त किडनीदात्यांमुळे,” अशा भावना व्यक्त करताना सभागृहात उपस्थित वातावरण भावनिक झाले होते.

श्री गंगा हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षांत किडनीरोग तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे २९ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील हॉटेल विसावा येथे हा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. देशमुख, वरिष्ठ फिजिशियन डॉ. साहेबराव मोरे, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. विजय कागणे, डॉ. राजेश्वर पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. किडनी निकामी झाल्यानंतर केवळ डायलेसिस हा अंतिम पर्याय नसून किडनी प्रत्यारोपण हा अधिक प्रभावी उपाय आहे. अधिकाधिक लोकांनी अवयवदानासाठी पुढे यावे.”

कार्यक्रमात किडनीदाते आणि प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. “संजय” (नाव बदललेले) या रुग्णाने अनुभव सांगताना, एका अनोळखी दात्यामुळे त्याला नवजीवन मिळाल्याचे सांगितले. हा प्रसंग सांगताना त्याला अश्रू अनावर झाले आणि सभागृहातील अनेक जणही भावूक झाले. डॉ. शहाजी जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “अवयवदानामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते. समाजातील भीती दूर करून जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

या कार्यक्रमाला डॉ. अंकुश देवसरकर, डॉ. राठोड, डॉ. टेंगसे (नेफ्रो सर्जन), डॉ. मसारे (नेफरोलॉजिस्ट), डॉ. विजय कांगणे, डॉ. राजेश पवार (डायरेक्टर, गंगा हॉस्पिटल), डॉ. भोपळे, डॉ. गोरे, डॉ. प्रतीक्षा देवसरकर, डॉ. बालाजी इबितवार तसेच विसावा ग्रुपचे संचालक श्री गजानन मुधोल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन हंबर्डे यांनी केले. श्री गंगा हॉस्पिटलचे व्यवस्थापक नदीम आणि त्यांच्या टीमने कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!