Kidney specialist : किडनीरोग तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांची कृतज्ञता ; उपस्थितांचे डोळे पाणावले
नांदेड| जागतिक किडनी दिनानिमित्त किडनीदान करून जीव वाचविणाऱ्या दात्यांचा तसेच त्यातून नवजीवन मिळालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा भावनिक “सत्कार सोहळा” उत्साहात पार पडला. हा आगळावेगळा “आपुलकी मेळावा” नांदेड शहरातील श्री गंगा हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात किडनीदात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे डोळे पाणावले. “आज आम्ही जिवंत आहोत, जग पाहू शकतो, ते फक्त किडनीदात्यांमुळे,” अशा भावना व्यक्त करताना सभागृहात उपस्थित वातावरण भावनिक झाले होते.
श्री गंगा हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षांत किडनीरोग तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे २९ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील हॉटेल विसावा येथे हा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला श...
