धार्मिकनांदेड

Sriram katha : “गुरु हा CCTV सारखा असावा; शिष्याच्या जीवनावर सतत लक्ष असावे” — राधाकृष्ण महाराज

रामनवमी निमित्त पिंपळगाव येथे श्रीराम कथेची सांगता उत्साहात

हदगाव/हिमायतनगर/भोकर /नांदेड|
रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त पिंपळगाव येथे आयोजित श्रीराम कथेची सांगता अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. कथा व्यास राधाकृष्ण महाराज यांनी यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना “गुरु हा CCTV सारखा असावा, ज्याच्या दृष्टीत शिष्याचे संपूर्ण जीवन असते,” असे प्रभावी प्रतिपादन केले.

IMG 20260326 WA0068 scaled Sriram katha : “गुरु हा CCTV सारखा असावा; शिष्याच्या जीवनावर सतत लक्ष असावे” — राधाकृष्ण महाराज

महाराज पुढे म्हणाले की, ज्या घरात सुंदर देवघर असते, त्या घरातच पावित्र्य, सकारात्मकता आणि देवत्व नांदते. प्रत्येकाने आपल्या घरात देवाचे स्थान निर्माण करून सतत नामस्मरण करावे, असे त्यांनी आवाहन केले.

IMG 20260326 WA0072 scaled Sriram katha : “गुरु हा CCTV सारखा असावा; शिष्याच्या जीवनावर सतत लक्ष असावे” — राधाकृष्ण महाराजकीर्तनात त्यांनी रावण व विभीषण यांचा प्रसंग सांगत बोधप्रद संदेश दिला. विभीषणाने आपल्या घरावर “राम” असे नाव लिहल्याने रावण संतप्त झाला; मात्र ‘रावण’मधील ‘रा’ आणि मंदोदरीतील ‘म’ मिळून “राम” होत असल्याचे मार्मिक उत्तर देत विभीषणाने भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. विभीषण हा श्रीरामाचा निष्ठावंत भक्त असून त्याच्या मुखी सतत रामनाम असायचे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“रामनामात अपार शक्ती असून ते मन, घर आणि समाज शुद्ध करते,” असे सांगत महाराजांनी उपस्थितांना रामभक्तीचा संदेश दिला.

IMG 20260326 WA0076 scaled Sriram katha : “गुरु हा CCTV सारखा असावा; शिष्याच्या जीवनावर सतत लक्ष असावे” — राधाकृष्ण महाराज

या कथेच्या सांगतेच्या प्रसंगी परिसरातील साधू-संत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण परिसर “जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे पिंपळगावमध्ये भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी समाधान व्यक्त केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!