Homeक्राईमHimayatnagar police raid : हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई : ४.८८ लाखांचा गुटखा-पान...

Himayatnagar police raid : हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई : ४.८८ लाखांचा गुटखा-पान मसाला जप्त

हिमायतनगर, अनिल मादसवार| अवैध गुटखा व पान मसाला विक्रीविरोधात हिमायतनगर पोलिसांनी मौजे पोटा बु.येथे धडक कारवाई करत तब्बल ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक २३ मार्चच्या रात्री ९.२० वाजताच्या सुमारास पोटा बु. परिसरात सापळा रचून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या ऑपरेशन प्लॅश अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथील मस्जिदच्या बाजूला शेख बाबा बलिसाब यांच्या टिन पत्र्याच्या घरामध्ये सय्यद सत्तार सय्यद खादर रा.पोटा याने विनापरवाना, बेकायदेशीर नागरिकांच्या आरोग्यास घातक असल्याने महाराष्ट्र शासनाने वाहतूक, साठवणुकीस बंदी असलेला गुटखा व पान मसाला विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आले.

यात पोलिसांनी गोवा १००० पान मसाला, वझीर केसरयुक्त गुटखा, जी-१ जर्दा, बाजीराव पान मसाला, केसर गोल्ड सुगंधित पान मसाला, मस्तानी २१६ व प्रीमियम च्युईंग तंबाखू असा विविध प्रकारचा तब्बल ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी श्यामसुंदर नागरगोजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. या धडक कारवाईमुळे हिमायतनगर परिसरात खळबळ उडाली असून, अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एलसीबीने पोटा बु. येथे यापूर्वी टाकला होता छापा
हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने दिनांक १८ रोजी छापा टाकून धडक कारवाई करत सुमारे सव्वा लाख रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. तरी देखील येथे पुन्हा मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठेबाजी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हिमायतनगर पोलिसांनी छापा टाकून कार्यवाही केल्याने हिमायतनगर शहर व तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

हिमायतनगर शहर व तालुक्यात अवैद्य रेती, मुरूम उत्खनन वाहतूक, गुटखा, मटका, जुगार, रेशनचा काळा बाजार, यासह इतर अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना असताना त्यावर पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याची नाराजी नागरीकातून व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments