Wednesday, May 13

Tag: Gutkha-Paan Masala

Himayatnagar police raid : हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई : ४.८८ लाखांचा गुटखा-पान मसाला जप्त

Himayatnagar police raid : हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई : ४.८८ लाखांचा गुटखा-पान मसाला जप्त

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| अवैध गुटखा व पान मसाला विक्रीविरोधात हिमायतनगर पोलिसांनी मौजे पोटा बु.येथे धडक कारवाई करत तब्बल ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक २३ मार्चच्या रात्री ९.२० वाजताच्या सुमारास पोटा बु. परिसरात सापळा रचून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या ऑपरेशन प्लॅश अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथील मस्जिदच्या बाजूला शेख बाबा बलिसाब यांच्या टिन पत्र्याच्या घरामध्ये सय्यद सत्तार सय्यद खादर रा.पोटा याने विनापरवाना, बेकायदेशीर नागरिकांच्या आरोग्यास घातक असल्याने महाराष्ट्र शासनाने वाहतूक, साठवणुकीस बंदी असलेला गुटखा व पान मसाला विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आले. यात पो...
error: Content is protected !!