HomeनांदेडLeopard Thrilling Rescue : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याचे थरारक रेस्क्यू

Leopard Thrilling Rescue : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याचे थरारक रेस्क्यू

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| उन्हाच्या तीव्रतेमुळे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटत चालल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर माहूर तालुक्यातील गोकुळ येथे एक धक्कादायक घटना घडली.

बुधवार, १८ मार्च रोजी रात्री पाणी व अन्नाच्या शोधात भटकणारा एक बिबट्या गोकुळ येथील सुमारे ३० फूट खोल विहिरीत पडला. गुरुवारी (१९ मार्च) सकाळी शेतकरी शिवम राजू यमजलवाड हे पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ गावकरी व वनविभागाला याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे पथक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. विहीर ३० फूट खोल असून त्यात सुमारे १५ फूट पाणी असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक ठरत होते.

IMG 20260319 WA0066 Leopard Thrilling Rescue : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याचे थरारक रेस्क्यू

वनविभाग आणि MH-29 रेस्क्यू टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पिंजरा विहिरीत उतरवला. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. सदर बिबट्या अंदाजे ९ महिन्यांची मादी असून वैद्यकीय तपासणीत ती पूर्णपणे सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तिला खरबी येथील जंगलात तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

IMG 20260319 WA0068 Leopard Thrilling Rescue : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याचे थरारक रेस्क्यू

या बचाव मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, वनपाल मनोहर कतुंलवार, मीर साजिद अली, वनरक्षक एफ.जी. माळेकर, ओम वरकड, संदीप तुपे, राकेश सोपरवर, मसू मजलवाड, वनसेवक वसंता चव्हाण, वसंत कुमारे यांच्यासह MH-29 रेस्क्यू टीमचे मोहन मुर्खे, शिवानंद कुटे, श्याम कुटे, सैफ अली शेख, ऋषिकेश कोटावर, विवेक तराडे, निलेश मेश्राम, अंकित कोथले, दिनेश पिंपरे, जीवन तडसे, सचिन कोकणे यांनी मोलाची भूमिका बजावली.

IMG 20260319 WA0067 Leopard Thrilling Rescue : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याचे थरारक रेस्क्यू

तसेच सिंदखेडचे सपोनी रमेश जाधवर आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते.
वनविभाग, पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमच्या समन्वयामुळे ही मोहीम यशस्वी ठरली असून एका वन्यजीवाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments