Leopard Thrilling Rescue : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याचे थरारक रेस्क्यू
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| उन्हाच्या तीव्रतेमुळे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटत चालल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर माहूर तालुक्यातील गोकुळ येथे एक धक्कादायक घटना घडली.
बुधवार, १८ मार्च रोजी रात्री पाणी व अन्नाच्या शोधात भटकणारा एक बिबट्या गोकुळ येथील सुमारे ३० फूट खोल विहिरीत पडला. गुरुवारी (१९ मार्च) सकाळी शेतकरी शिवम राजू यमजलवाड हे पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ गावकरी व वनविभागाला याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे पथक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. विहीर ३० फूट खोल असून त्यात सुमारे १५ फूट पाणी असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक ठरत होते.
वनविभाग आणि...
