HomeनांदेडRetirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात

Retirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात

लोहा| सेवानिवृत्तीला अवघे दोन महिने शिल्लक असताना केंद्रप्रमुख दिगंबर रामचंद्र शिंदे (वय ५७) यांना अर्जित रजा मंजूर करण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना लोहा पंचायत समिती परिसरात उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लोहा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिसनगाव (ता. लोहा) येथे कार्यरत असलेले शिंदे यांनी एका शिक्षकाकडून रजा मंजुरीसाठी चार हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सोमवारी (१६ फेब्रुवारी) पंचायत समिती कार्यालय परिसरात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पथकाने पकडले.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्या वतीने लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिंदे यांना अटक करून पुढील चौकशीसाठी नांदेड येथे नेण्यात आले. अंगझडती दरम्यान त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिता चव्हाण, पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत पवार, तपास अधिकारी अर्चना करपुडे व त्यांच्या पथकाने केली. विशेष म्हणजे शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून सेवेत असून सध्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होते.

दरम्यान, जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यात अलीकडेच कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे शिक्षण विभागात संताप व्यक्त होत असून, शासकीय कार्यालयांतील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments