Wednesday, May 13

Tribute to Ajitdada : लोहयात अजितदादांना श्रध्दांजली ; सर्व प्रतिष्ठाने शाळा महाविद्यालय बंद

लोहा| राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे अख्खा लोहा शहर व मतदारसंघ शोककळा पसरली असून आमदार प्रतापराव पाटील व कार्यकर्ते डसाडसा रडताहेत.अनाकलनिय वेदनादायी घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

लोहा शहरातील शाळा, महाविद्यालय, सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून शहरवासियांनी दुखवटा।पाळला. नगर पालिका प्रांगणात बुधवारी सकाळी युवा नेते पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व श्रद्धांजली वाहण्यात आली.

लोहा-कंधार मतदार संघात उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे चाहते प्रचंड होते. निधनाची बातमी कळताच आ, प्रतापरावाना अश्रू अनावर झाले . सगळ्या कार्यकत्यांना घटनेचे प्रचंड दुःख झाले. फारच वाईट झाले असा अंतरकरणातून संवेदना व्यक्त करत कार्यकर्ते अश्रू ढळत होते. शहरात शाळा महाविद्यालय, सर्व दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आले व दुखवटा पाळण्यात आला.

नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करिम शेख, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराक्ष केशवराव मुक्‌दम, छत्रपती धुतमल, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब क-हाळे, गटनेता भास्कर पवार, हरिभाऊ चव्हाण, मारुती पाटील, संजय मक्तेदार, बालाजी खिलारे, बी. डी. जाधव, गणेश बगारे, यासह हरिहर धुतमल, गोविंद कदम व मोठ्या संख्येने मान्यवरांनी अजितदादांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला , नगर पालिका प्रांगणात युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत अजितदादांनाश्रध्दांजली वाहण्यात आली.

1001427049 Tribute to Ajitdada : लोहयात अजितदादांना श्रध्दांजली ; सर्व प्रतिष्ठाने शाळा महाविद्यालय बंद

प्राणिताताई देवरे चिखलीकर,वसंतराव पवार युवा नेते शिवराज पाटील धोंडगे, जि प माजी उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल , माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार ,यासह अनेकांनी अजितदादा याच्या सोबतच्या आठवणी शेअर केल्या व श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!